प्रा. म. द. हातकणंगलेकरके.बी.चे कलामंदिर पाहिले. खोलीचे जुने कुलुप पाहिले. वर जाण्यासाठी तेव्हाचा जुना लडबडता जीना होता. त्यावरून आता कोण जात असावं? स्मरणाने मन लडबडावे असा तो जिना कितीवेळा मी तो चढलो होतो. के.बी.च्या कला दालनाच्या दरवाजा उघडून आत गेलो होतो. बसायला एकच खुर्ची असायची. आत एक लहान खोली होती. के.बी. रंगांच्या भांडयांत बाटल्यात बसलेले दिसायचे. मला पाहून मंद हसायचे. आता तो जीना पाहून भडभडून आले. जीन्याल्याच नमस्कार केला.
No comments:
Post a Comment