11/28/10

हेमांगी दिवाळी अंक

दरवर्षीप्रमाणे यंदाही हेमांगी दिवाळी अंकात दर्जेदार साहित्याची मेजवानी आहे. कथा, कादंबरी, प्रासंगिक लेख, व्यक्तीविशेष, विडंबन या प्रकारचे लेखन दिग्गजांनी केलेले आहे. या वर्षापासून हा दिवाळी अंक आता ऑनललाइनही पाहता येणार आहे. खालील दिलेल्या लिंकमध्ये हा अंक तुम्हांला पाहला मिळणार आहे.

हेमांगी दिवाळी अंक भाग १ 

हेमांगी दिवाळी अंक भाग २

हेमांगी दिवाळी अंक भाग ३

11/27/10

सर्वसाक्षी


संजीवनी खेर  
...साऱ्या संकल्पनाच सूर्याभोवती फेर धरून नाचतांना दिसू लागल्या. काहींनी सूर्य हा स्त्रीरूपात मांडला. अनेक प्राणी त्याच्याशी संलग्न झाले. हे सारे होत गेले कारण त्याचे रूप नि प्रतीकं सृजनशीलांना स्फूर्तीदायक ठरतांना मला दिसत होती.

राजा थिबा


मधू मंगेश कर्णिक
एकोणीसाव्या शतकात ब्रिटीशांनी ब्रह्मदेशचा राजा थिबा याला पदच्युत करून त्याचे साम्राज्य खालसा केले व त्याला रत्नागिरीला आणून जवळजवळ नजरकैदेत ठेवले. या ब्रम्ही सम्राटाची जीवनकथा विलक्षण नाटयमय आहे. मधु मंगेश कर्णिक यांना थिबाच्या जीवनपटामध्ये कादंबरीचे बीज आढळले. त्यांनी त्यासाठी अथक परिश्रम करून अनेक संदर्भ गोळा केले.

स्वरभाव : पं. अजय पोहनकर


सुलोचना देवलकर
आजकाल टी.व्ही.च्या पडद्यावर वेगवेगळया रिऍलिटी शोजमधून झळकणारे अनेक  कलाकार आपण पहातो. त्यांची गाण्यातली समज पाहून थक्क होतो. पण पुढे या मुलांचं काय होतं? पैसा - प्रसिध्दीच्या अचानक आलेल्या लाटेत ती वाहून जातात? की त्यांना पुढे योग्य तालीम आणि मार्गदर्शन मिळत नाही? की प्रचंड स्पर्धेच्या आजच्या युगात त्यांना पुढे येण्याची संधी मिळत नाही?


'संजीव'क सूर


गौरी कुलकर्णी
'पुणे तिथे काय उणे' असं बीद्र अभिमानाने मिरवणाऱ्या पुणे शहरात संजीवजींचा जन्म झाला. त्यांचे वडील विजय अभ्यंकर हे पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांना सुध्दा संगीताचा उत्तम कान आहे. संजीवजींची पत्नी अश्विनी आर्किटेक्ट असून विशेष म्हणजे ती सुध्दा शोभाताई अभ्यंकरांची शिष्या आहे.


'उभयगानविदुषी डॉ. शामला भावे'


सुलोचना देवलकर
शामलाताईंचं आयुष्य खूपच प्रेरणादायी आहे. या वयातही त्या गाण्याच्या मैफिली करतात. रेकॉर्डिंग करतात. शास्त्रीय संगीताच्या जोडीने त्या भक्तीसंगीत, सुगम संगीतही तितक्याच तयारीने गातात. त्यांच्या मैफिलीत त्या फक्त स्वत: संगीतबध्द केलेल्या रचनाच गातात हे त्यांचं आणखी एक वैशिष्टय आहे.


जिवाभावाचा स्नेही


डॉ. सुभाष भेण्डे
कर्णिकांचं वाङ्मयीन व्याक्तिंमत्त्व त्यांच्या लौकिक व्यक्तिमत्त्वांशी एकनिष्ठ झालेलं आहे, हे मला नेहमीच जाणवत आलेलं आहे. ध्येयनिष्ठेची, त्यागमहतेची, विशाल मानवतेची त्यांना उपजत ओढ आहे. संतांवर त्यांची श्रध्दा आहे. जीवनातील सत्य, शिव व सुंदर टिकलंच पाहिजे अशी त्यांची धारणा आहे.


मुलुख मैदान सम्राट अशोक (नायगावकर)


साहेबराव ठाणगे
काळाच्या पटलावर आपला वेगळा ठसा उमटविणारा, आपल्या आगळया वेगळया शैलीच्या काव्य वाचनातून, मराठी मुलखाला अंतर्मुख व्हायला लावणारा, आजचा एकमेद्वीतीय कवि म्हणजेच 'डाव्या' हाताने उजव्या कविता लिहिणारा 'अशोक नायगावकर' काळाच्या पुढं धावणारा आजचा दृष्टा कवी ठरला आहे.


मायेची सख्खी सोबत


डॉ. रूपा रेगे - नित्सुरे
तिने स्वत:ला 'कंपार्टमेन्टस्'मध्ये जगायला शिकवलं. ऑफिसात असताना ती संपूर्णपणे घराला विसरू शकायची व घरी आल्यावर संपूर्णपणे घरची व्हायची. इतकी की अचानकपणे घरी टपकलेल्या पाहुण्यांना ती एक उच्चपदस्थ सरकारी अधिकारी आहे, हे लक्षातही यायचं नाही. तिच्या सतत काम करत रहाण्याच्या सवयीचं ती कौतुकाने 'ऑक्युपेशनल थेरपी' असं वर्णन करते. ही थेरपी तिने फार प्रभावीपणे ताणमुक्त होण्यासाठी वापरली.


समांतर गांगल


जयराज साळगावकर
समाजाची अभिरुची संपन्न करण्यासाठी गांगलांनी अथक प्रयत्न केले. त्यातील पुढचा टप्पा ग्रंथाली हा होय! मराठी प्रकाशन व्यवसायात आलेला तोच तोचपणा दूर करून मराठी वाचकाला वैचारिकदृष्टया अधिक समृध्द करण्यासाठी ग्रंथालीने काय काय केले ते त्यांनी प्रसिध्द केलेल्या पुस्तकांच्या यादीवर एक नजर टाकली तर ध्यानात येते.

\

जिवलग मित्र, अवलिया संपादक


डॉ. प्रल्हाद वडेर
''...वाङमयीन मासिक चालविणे हा धंदा नाही. हे ध्येय आहे. ह्यात पैसा नाही. प्रतिष्ठा एकेकाळी मिळत असे. तीही आता संवग झाली आहे. आणि प्रतिष्ठा माणसाला जगवते ह्यावरचा माझा विश्वास मात्र नष्ट झालाय. प्रतिष्ठा आहे खरी, ती टक्क्यांना! आभास असा निर्माण केला जातो की संपादक हा धंदेवाईक माणूस आहे.

एक स्मरण भेट


प्रा. म. द. हातकणंगलेकर
के.बी.चे कलामंदिर पाहिले. खोलीचे जुने कुलुप पाहिले. वर जाण्यासाठी तेव्हाचा जुना लडबडता जीना होता. त्यावरून आता कोण जात असावं? स्मरणाने मन लडबडावे असा तो जिना कितीवेळा मी तो चढलो होतो. के.बी.च्या कला दालनाच्या दरवाजा उघडून आत गेलो होतो. बसायला एकच खुर्ची असायची. आत एक लहान खोली होती. के.बी. रंगांच्या भांडयांत बाटल्यात बसलेले दिसायचे. मला पाहून मंद हसायचे. आता तो जीना पाहून भडभडून आले. जीन्याल्याच नमस्कार केला.


बाबा

सौ. शर्मिला राज ठाकरे
मराठी रंगभूमीचे अनभिषिक्त सम्राट सुप्रसिध्द नाटककार व नेपथ्यकार श्री. मोहन वाघ यांचे २७ मार्च २०१० ला वृध्दापकाळाने निधन झाले. एक वादळी व्यक्तिमत्त्व असाच त्यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांच्या 'चंद्रलेखा' या नाटयसंस्थेतर्फे रंगभूमीवर आलेली जवळजवळ सर्वच नाटके अतिशय गाजली.
त्यांच्या कन्या सौ. शर्मिला राज ठाकरे यांनी रेखाटलेले आपल्या पित्याचे व्यक्तीचित्र त्यांच्या शब्दात...


चित्रे रेखाटता - रेखाटता...


श्रीनिवास प्रभूदेसाई
सुप्रसिध्द व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी आजवर हजारो कॅरीकेचर्स (तात्काळ व्यक्तिचित्रं- कार्टुन्स) काढली. त्यानिमित्त  अनेक मोठमोठया व्यक्तींशी, सेलिब्रिटीजशी त्यांचा परिचय झाला... या त्यांच्या उपक्रमाला सामान्य प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. त्यातून त्यांना अनेक अनुभव आले. काही गमतीशीर तर काही लक्षात ठेवण्याजोगे...
त्यातील काही निवडक अनुभवांचे संकलन, त्यांच्याच शब्दात...

समाजवादी चळवळीची शोकांतिका


अमरेन्द्र धनेश्वर
समाजवादी चळवळ आणि तिचे नेतृत्व करणारे नेते आपल्या देशाचे भूषण होते. बुध्दिमत्ता, चारित्र्य, त्याग आणि करिष्मा या सर्व कसोटयांवर नेहमीच झळाळणारे असे हे नेतृत्व होते. वाक्पटुत्व देशातल्या गरीब आणि श्रमिक वर्गाविषयीचा कळवळा. त्यासाठी केलेला जिगरबाज संघर्ष आणि सोसलेली झीज या सर्व बाबतीत समाजवादी नेतृत्वाने किंवा कार्यकर्त्यांनीही देशापुढे जणू एक आदर्श ठेवला होता.

मुलाचा मुलगा


इसाक मुजावर
'खानदान की परंपरा' बॉलीवूडला नवीन नाही. थेट पृथ्वीराज-राजकपूरपासून अगदी अलीकडच्या अमिताभ-अभिषेक बच्चनपर्यंत अनेक पिता-पुत्रांनी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवलेलाआहे.
धमेंद्र-सनी-बॉबी देओल, किशोरकुमार-अमितकुमार, राजेंद्रकुमार-कुमार गौरव, सुनिल-संजय दत्त अशी अनेक नावे घेता येतील.या सर्व फिल्मी खानदानाविषयी...


महाबलीपुरम् आणि कांचिपुरमचे शिल्पवैभव


 पुष्पा जोशी
महाबलीपुरम् आणि कांचिपुरम् यासारखे शिल्पवैभव साऱ्या भारतभर विखुरलेले आहे. अज्ञात कलाकारांनी परिश्रमाने निर्मिलेले हे वैभव जतन करणे, त्याची निगा राखणे, त्याचा इतिहास जपून ठेवणे व आपल्या पुढील पिढयांकडे हा समृध्द वारसा सुपुर्द करणे हे आपले कर्तव्य आहे.

चार खंडांची एकसंघ कथा


विजया राजाध्यक्ष
भास्कर गोडांब्यांच्या सनातनी घरात जन्मलेल्या प्रभाच्या वाटयाला तसं चाकोरीबध्द आयुष्य येतं. बीएपर्यंत शिक्षण होतं. पुढे शंकर साठे ह्या इंग्रजीच्या प्राध्यापकाशी लग्न होऊन ती मुंबईवाशीण होते. ॠता आणि गौरी ह्या कळया तिच्या संसाराची चौकट पूर्ण करतात.
परंतु मैत्रिणीच्या रूपाने आलेल्या श्यामलाबाई तिचं  जीवन अळणी करून टाकतात...

संस्कार


विकास देशमुख

''... स्वतःच्या सीमा कुठपर्यंत आहेत ते अन्निकाला चांगले माहित आहे. आमच्या दोघींच्यात खूप मोकळेपणा आहे. त्यामुळे ह्या विषयावर आमचे नेहमी बोलणे होते. मी तिला सांगितलंय, 'स्वातंत्र्याबरोबर जोडीने जबाबदारी वाढते. तुला जितकी जबाबदारी पेलवेल तितकेच स्वातंत्र्य तू घे! ते तिला पूर्णपणे पटलेय, म्हणून मला फार काळजी नाही वाटत.''

गाणारा टायपिस्ट


भूपेंद्र मिस्त्री
राजेश उठून बसला होता. बऱ्याच दिवसानंतर त्याच्या चेहऱ्यात फरक जाणवत होता, त्याने रमेशचा हात हातात घेतला आणि बराच वेळ तसाच ठेवला. मग त्यानं मधूभाईंकडे पाहिलं. जणू त्याला विचारायचं होतं. 'कोण आहे हा माणूस?' मधूभाई त्याला म्हणाले, ''बेटा हा रमेश. मोठया कंपनीत मॅनेजर आहे. मिटींगसाठी इकडे आला होता, सहज भेटायला आला, पण आपलं नशिब आहे...''

एकास दोन!


सुधीर सुखटणकर
प्रथम पत्नी जीवीत असताना दुसरं लग्न करण्याची पूर्वी प्रथा होती. आजही प्रथम पत्नीच्या लेखी संमतीने पुरुष दुसरं लग्न करू शकतात. आणि दोघींनाही एकत्र नांदवू शकतात. मग हाच न्याय महिलांनी का लागू होऊ नये? महिलांनीही पहिलं लग्न झालेलं असताना पहिल्या नवऱ्याबरोबरच दुसऱ्या पुरुषाचाही 'नवरा' म्हणून विचार केला तर..?
एका खळबळजनक विषयावरील दीर्घकथा...

व्हर्च्युअली युवर्स

माधवी कुंटे
हे असं विचित्र काहीतरी घडेल अशी काही कल्पनाच नव्हती. म्हणजे घडलं तेव्हाही आधी काही वेगळं घडलंय असं क्षणभर जाणवलंच नाही. जाणवायला लागलं तेव्हा भयाची शिरशिरी सगळया अंगभर फिरली. मन सुन्न झालं. खरं तर आतल्या अंतरातसुध्दा जे घडलं ते नाकारण्याकडेच कल होता. असं कसं होईल

एका भिकाऱ्याची गोष्ट


रामचंद्र नलावडे
भगवान कोकण रेल्वेच्या डब्यात भीक मागायचा. त्याचे दोन्ही पाय लहानपणीच्या आजारपणात वाकडे झाले होते. पायात जोर नव्हता. तो तोतरं बोलत असे. त्याच्या शारीरिक व्यंगाकडे पाहून त्याचं लग्न झालेलं आहे आणि त्याला दोन मुलं आहेत ह्यावर कुणाचा विश्वास बसत नसे. मालन - त्याची बायकोही अपंग होती...

प्रेम आणि भटजीबुवा


  विजय ना. कापडी
युध्दात आणि प्रेमात सगळं क्षम्य असतं. राणीला पटवायला राजा भटजीबुवा बनला तर त्यात आश्चर्य ते काय? पण राजाचं हे सोंग हुबेहूब वठतं, की ही चाल त्याच्यावरच उलटते?

11/26/10

आपुले मरण पाहिले मी डोळा...


मधुकर हसमनीस
स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात, परंतु लेखकाने 'आपुले मरण याची देही याची डोळा' पाहिले, त्याची मजेशीर इनोदी कथा .......

मराठी 'पोपट' आणि जागतिकीकरण


डॉ. आनंद पाटील
'पोपटपंची' या वाक्यप्रकाराचा अर्थ भ्रष्ट नक्कल करणे असा आहे. इंग्रजीत पॅरट्री, मिमिक्री, स्टिंरिओटाईप्स (एकसाची), इमिटेशन (अनुकरण), शॅडो (सावली) वगैरे प्रकारचे सिध्दांत आहेत. कवीला अशी नक्कलबाजी अभिप्रेत नसली तरी तशा अनेक संरचना त्याच्या 'जीन्स'च्या (जतुकांच्या) मेंदूतील संगणकात पडून असतात. ते कळण्या इतपत मराठी जान भाषा तयार व्हावी ही तो श्रींची इच्छा.

शेवटची घटका


सुरेश वांदिले
विविध कारणासाठी मोठया प्रमाणावर अवैध शिकार आणि प्राण्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणावर बेहिशोबी अतिक्रमण या दोन मुख्य कारणांमुळे या प्राण्यांना आता जीवनमरणाची लढाई लढावी लागत आहे. या प्राण्यांपेक्षा मानवी जीव अमूल्य समजणे आणि मानवी जीवासाठीच वसुंधरेची निर्मिती झाली,अशी वृत्ती बाळगणं या कारणांमुळे हे प्राणी आज शेवटची घटका मोजत आहेत.

क्रिकेटचा माहितीकोश


अशोक बेंडखळे
रवींद्र पाटकर म्हटले की, सर्वसाधारण वाचकांसमोर रविवारच्या नवशक्तीमध्ये क्रिकेटचा किस्सा काहीसा पाल्हाळिक शब्दात रंगवून सांगणारे लेखक ही प्रतिमा नजरेसमोर येते. मात्र पाटकरांमध्ये विविध विषयात रस घेणारे व्यक्तिमत्व दडले होते हे अनेकांना माहित नाही. 

कविता


सुरेखा पाटील , प्रकाश मुरूडकर , उध्दव भयवाळ, गोविंद केळकर, प्रकाश रा. क्षीरसागर.फ, व्यंकटेश वळसंगकर, राजा गायंगी,अशोक गुप्ते, श्रीकांत नरूले, ह.शि.खरात, अरविंद हसमनीस, वंदना कुलकर्णी, नीरजा नणदीकर, दया मित्रगोत्रा, नीलिमा आंगले,  मधुकर शंकर प्रधान, सु. म. तडकोड,  डॉ. नागेश सोनटक्के, - अनुपमा उजगरे, मानसी सोनटक्के, राजेश देशपांडे यांच्या कविता

साहित्य निमिर्तीसाठीच नाही आस्वादासाठीही प्रतिभेची गरज


डॉ. द.भि.कुलकर्णी
८३व्या  अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.द.भि. कुलकर्णी यांनी केलेल्या  उत्स्फूर्त भाषणाचे हे लेखरूप...

उदरात तुझ्या दडलंय काय?


डॉ. सुजाता वाघ
डॉ. संतोष वाघ
स्त्री ही क्षणाची प्रेयसी तर अनंत काळाची माता असते. असं म्हटलेलंच आहे. आपण आदर्श माता बनावं आणि आपली मुलं सर्वत्र चमकावीत ही सर्व महिलांची मनापासूनची इच्छा असते. माता तर बनायचंय पण प्रक्रिया खूपच मोठी. ज्यांना मातृत्व सहज मिळतं त्यांना त्यातली जटीलता जाणवतसुध्दा नाही पण माता बनण्यापूर्वी कोणाची तरी प्रेयसी तर बनायला हवं

सुशीलकुमारांचे ई-चरित्र!


सोमनाथ पाटील
शिंदेसाहेबांच्या आयुष्यात त्यांच्या हातून काही संधी सुटल्या. काही त्यांनी सोडून दिल्या तर काही संधी पात्रता व सक्षमता (कॉम्पिटन्स) असूनही त्यांना नाकारण्यात आल्या. याबद्दल त्याच्या मनात खेद निश्चितच असेल कारण ती भावना येणे स्वाभाविकच आहे, परंतु कुठेही कडवटपणा किंवा कटुतेचा लवलेश नाही. हे त्यांना कसे साधते? त्यांचे पॉजिटिव्ह थिंकिंग व पॉझिटिव्ह अॅप्रोच यामुळे. नाकारण्यात आलेल्या एखाद्या संधीचे व्यावहारिक व राजकीय महत्त्व त्या त्या टप्प्यावर अमोल असे होते.

वास्तवातली धारावी

प्रसाद केरकर
धारावीचा संपूर्ण विचार करता ही वस्ती म्हणजे मिनी इंडिया वाटावी अशीच आहे. संपूर्ण देशातून लोक इकडे आपले पोट भरण्यासाठी येतात आणि इथेच स्थिरावतात, मात्र इकडे विसावत असताना इथला कुणीही माणूस आपली गावाकडची नाळ तोडीत नाही. तो ज्या भागातून आला त्या भूमीशी नाते जोडून असतो. 

किमयागार

माधुरी महाशब्दे
पंढरीदादांनी हिंदी चित्रपट सृष्टीतील जवळजवळ सर्वच कलाकारांना मेकअप केला आहे. दिलीप कुमार, मधुबाला, राजकपूर, पृथ्वीराज कपूर, प्राण, जीवन, नूतन अशी जुनी पिढी तर त्यांच्या हाताखालून गेली आहेच पण नंतरच्या माधुरी दीक्षितपासून आजच्या अनेक कलाकारांनाही त्यांनी मेकअप केला आहे. 

‘मॉकिंगबर्ड’ची जनक

लता राजे
हार्पर ली आज ८४ वर्षे वयाची आहे. तर ‘टू किल अ मॉर्किंगबर्ड’ ही कादंबरी यंदा ५० वर्षांची झाली आहे. या पन्नाशीचा सोहळा अमेरिकन रसिक वर्षभर दणक्यात साजरा करीत आहेत. मात्र या सोहळ्यातील कोठल्याही समारंभास हार्पर ली उपस्थित राहत नाही.

सविस्तर लेख वाचण्यासाठी इथं क्लिक करा

स्पेशल चहा

प्रशांत जाधव
वारीत मला खूप चांगले वाईट अनुभव आले साहेब. वारक-यांची चिकाटी आणि त्या विठ्ठलाप्रती प्रेम पाहून कोणी किती चिवड बनावे याची शिकवण मला मिळाली आहे. तुम्हाला सांगतो साहेब. या वारीने मला वागायला नाही तर जगायला शिकवलं आहे. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता, हे वारकरी त्या पंढरीच्या सावळ्याला भेटायला जातात.

सविस्तर कथा वाचण्यासाठी इथं क्लिक करा

प्रतिष्ठिला ज्यांनी मराठी देव्हारा

आशा किशोर धारप
अविश्रांत मेहनत, विलक्षण उरक, जिद्द, पराकाष्ठेचा कामाचा सपाटा, ह्या गुणवैशिष्ट्यांमुळे सरोजनीबाईंनी जी अक्षरशः डोंगराएवढी प्रचंड कामं केली त्याची यादीही फारच मोठी आहे. मुंबई-विद्यापीठात मराठी-विभाग प्रमुख असताना त्यांनी आयोजित केलेली वाङ्मयीन चर्चासत्र ही फार महत्त्वाची ठरली. 

दुरावा

सुलभा कोरे
अण्णा अन् बाई यात कोण चुकतंय किंवा कोण बरोबर आहे. हा मोठाच प्रश्न आहे. अण्णांचा आत्माभिमान अन् बाईची मातेची ममता व एका स्त्रीचं आतलं दुखणं या दोन्ही गोष्टी अशाच दुरावल्या आहेत. पंचेचाळी वर्षांच्या सहजीवनानंतर ही अशी दुराव्याची दरी...

सविस्तर लेख वाचण्यासाठी इथं क्लिक करा

तूच तुझ्या पोर्टफोलीओचा शिल्पकार

अजय वाळिंबे
आपल्या पोर्टफोलीओ उत्तम असावा असं कुणाला वाटत नाही? मात्र हाच पोर्टफोलीओ तयार करताना किती गंभीरतेने तुम्ही रिसर्च करता? केवळ कुणीतरी सांगत म्हणून किंवा एखादा शेअर निफ्टी किंवा ‘अ’ गटात आहेत म्हणून देखील तो शेअर खरेदी करणारे गुंतवणूकदार आहेत.

सविस्तर लेख वाचण्यासाठी इथं क्लिक करा

युलिपची गरज आहे का?

विनायक कुलकर्णी
मुळात ‘युलिप’ सारखी योजना स्वीकारणे गरजेचे आहे का? हा प्रश्न गुंतवणुकदारांनी स्वतःला विचारला पाहिजे. विमा संरक्षण आणि शेअरबाजार निगडीत गुंतवणूक यांचा एकत्रित लाभ मिळविण्यासाठी आपण किती ‘किंमत’ मोजावी याला निश्चितच मर्यादा हवी.
सविस्तर लेख वाचण्यासाठी इथं क्लिक करा

8/25/10

हेमांगी दिवाळी अंक २००९ ची झलक

दर्जेदार साहित्याने परिपूर्ण असलेला हेमांगी दिवाळी अंक आता ऑनलाइन झाला आहे. येत्या वर्षापासून या दर्जेदार साहित्याचा आस्वाद ऑनलाइन घेता येणार आहे. हे साहित्य तुम्हाला युनिकोडमध्ये तसेच पीडीएफ फॉर्मेटमध्ये वाचायला मिळणार आहे. तत्पूर्वी २००९मध्ये प्रसिद्ध झालेल्या हेमांगी दिवाळी अंकाची ही झलक  वाचकांसाठी दिली आहे.

हेमांगी दिवाळी अंक खाली दोन लिंक मध्ये देण्यात आला आहे.
भाग -१
भाग- २

8/24/10

प्रकाशाची बेटं - दुर्गाकमळा


दुर्गाकमळा! दुर्गाबाई भागवत आणि कमलाबाई सोहोनी. दोघी सख्या बहिणी. मोठया दुर्गाबाईने साहित्यविश्व व्यापले  तर धाकटया कमळाबाईने अवघे विज्ञानविश्व आपलेसे केले. दुर्गाकमळा हा शब्द हेतुत: योजला आहे. या दोघी बहिणी अहमदनगरला आत्या सीताबाई भागवत यांच्याबरोबर राहून शिकत असताना, पंचक्रोशीतल्या मुली खेळायला त्यांना हाक मारीत ती 'दुर्गाकमळा' या जोडनावाने. मग त्यांतील एखादीला जरी बोलवायचे झाले तरीही 'दुर्गाकमळा' अशी दुपेडी हाकच येई. त्यांचा उल्लेखही 'दुर्गाकमळा' असाच केला जाई. बहिणींचे हे अद्वैत अखेरपर्यंत टिकले.

आनंदयात्री- बा. भ. बोरकर

बा.भ. बोरकर (जन्म 1910- मृत्यू-1984) यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. मराठीतील एक विलक्षण समृध्द व विविध पैलू असलेलं व्यक्तिमत्त्व. बारा मराठी कवितासंग्रह, तीन कोकणी कवितासंग्रह, तीन स्वतंत्र मराठी कादंबऱ्या, काही अनुवादित कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, तीन ललितलेख संग्रह, मेघदूत, रघुवंश या दोन संस्कृत काव्यांचे अनुवाद, काही स्वतंत्र संपादने, 'महात्मायन'चा अपूर्ण पण अपूर्व संकल्प. 

सविस्तर लेख वाचण्यासाठी इथं क्लिक करा